Chhagan Bhujbal Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: येवल्यात छगन भुजबळांना कुणाचं आव्हान? मविआची काय आहे रणनीती? वाचा...

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यातच काँग्रेस नेते दत्ता आव्हाडांनी मंत्री छगन भुजबळांविरोधात दंड थोपटलेत.तर थेट मल्लिकार्जून खर्गे आणि मधूसुदन मिस्त्रींची भेट घेत भुजबळांविरोधात उमेदवारी देण्याची मागणी केलीय. तर दत्ता आव्हाड कोण? असा सवालच भुजबळांनी केलाय.

भुजबळांना कुणाचं आव्हान?

भाजपच्या अमृता पवार भुजबळांविरोधात तुतारी फुंकण्याची शक्यता

पवारांच्या पक्षाचे माणिकराव शिंदे इच्छूक

ठाकरे गटाकडून कुणाल दराडे इच्छूक

छगन भुजबळ हे 20 वर्षापासून येवल्याचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र या 20 वर्षात भुजबळांच्या मतांचा आलेख उंचावत गेलाय.

भुजबळांना मिळालेली मतं

2004- शिवसेनेच्या कल्याणराव पाटलांच्या विरोधात 35,649 मतांनी विजयी

2009- शिवसेनेकडून माणिकराव शिंदेंच्या विरोधात 50,180 मतांचं लीड

2014- शिवसेनेच्या संभाजी पवारांविरोधा 46,442 मतांनी विजयी

2019- शिवसेनेच्या संभाजी पवारांविरोधात 56,525 मतांनी विजय

येवल्यातील जातीय समीकरण

मराठा समाजाचं 1 लाख 25 हजार मतदान

ओबीसी समाजाचं 1 लाख 20 हजार मतदान

एससी आणि एसटी समाज- 45 हजार

मुस्लीम समाज - 35 हजार मतं

इतर जाती- 11 हजार मतं

मनोज जरांगे फॅक्टर, महायुतीचं कांद्याबाबतचं धरसोडीचं धोरण, भुजबळ महायुतीत असल्याने अल्पसंख्याकांची नाराजी आहे. त्यातच लोकसभेला येवल्यातून भास्कर भगरेंना 13 हजारांचं लीड मिळालं. त्यामुळे आतापर्यंत पवारांचं बळ सोबत असलेल्या भुजबळांना आता स्वतःच्या बळावर यश मिळणार का? याकडे लक्ष लागलंय..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'अजित पवार-प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं'; आमदार अमोल मिटकरींचं विधान

Fact Check : एक गोळी खाल्ल्याने व्यायामाची गरज नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Jammu-Kashmir : 'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र

Bharat Gogawale: 'काम करणारा भाऊ की, XXX बनवणारी बहीण हवी', भरत गोगावलेंची महिला नेत्याबद्दल बोलताना जीभ घसरली

Nana Patole: 'मीच होणार मुख्यमंत्री', नाना पटोलेंचा मुखयमंत्रिपदावर दावा; CM पदावरून मविआत बिनसणार?

SCROLL FOR NEXT