Pune Girl Video Viral SAAM TV
Video

VIDEO : रील्ससाठी स्टंट करणाऱ्या पुण्यातील तरुणीची ओळख पटली, कोण आहे ती? आता पुढे काय होणार?

Pune Girl Video Viral : पुण्यात एका इमारतीच्या छताला लटकून जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणीची ओळख पटली आहे.

Nandkumar Joshi

अक्षय बडवे, साम टीव्ही | पुणे

प्रसिद्धीसाठी कायपण! असा अॅटिट्यूड असलेल्या पुण्यातील त्या स्टंटबाज तरूणी आणि तरुणांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या स्टंटबाज तरुणीची ओळख पटली आहे. जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्या या तरुणीसह तिच्यासोबतच्या तरुणांना पोलिसांनी समज दिली आहे.

पुण्यातील एका इमारतीच्या छताला लटकून ही तरूणी स्टंट करत होती. तिच्यासोबतच्या एका तरुणानं तिच्या हाताला पकडले होते. तर त्याच्या मदतीने ही तरूणी इमारतीच्या छतावरून खाली उतरली आणि त्याच्या हाताला लटकली होती. तर बाजूलाच असलेला तरूण ही सगळी स्टंटबाजी शूट करत होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर जीव धोक्यात घालून रील्सकरिता स्टंट करणाऱ्या अशा तरुणांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी, अशी मागणी होऊ लागली होती.

पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांचा शोध सुरू केला. अखेर या स्टंटबाज तरूणांची ओळख पटली. दोघेही अॅथलिट असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ एप्रिलमधला असल्याची माहिती या तरुणांनीच दिली. पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत. न्यायालयाच्या मदतीने या दोघांविरोधात कलम ३०८ म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का, यासाठी प्रयत्न करत आहेत.

पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका इमारतीच्या छतावर हे तरूण जीवघेणा स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ती मुलगी भरधाव दुचाकीवर हात सोडून स्टंट करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

SCROLL FOR NEXT