Video Saam TV
Video

VIDEO : बापरे! आकाशातून पडला भलामोठा फुगा, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील घटना; नागरिक धास्तावले

Viral Video : वैजापूर तालुक्यातील कागोंणी शिवारात आकाशातून झेपावलेला फुगा आणि पांढऱ्या रंगाचा डब्बा शेतजमिनीवर पडला आहे. हे पाहून प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झालीये.

Ruchika Jadhav

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आकाशातून पांढऱ्या रंगाचा डबा पडल्याने खळबळ उडालीय. काल सायंकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे गावात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील कागोंणी शिवारात आकाशातून झेपावलेला फुगा आणि पांढऱ्या रंगाचा डब्बा शेतजमिनीवर पडला आहे. हे पाहून प्रशासनाचीही चांगलीच धावपळ झालीये. आकाशातून पडलेले हे साहित्य हवेचा दाब, उष्णता, हवेतील आर्द्रता, हवेची दिशा व पावसाचा अंदाज दर्शविणारे यंत्र असून ते नादुरुस्त झाल्याने पडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सापडलेल्या यंत्राचे अवशेष पुणे येथील हवामान विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहे.

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हवामानाचा अंदाज काय आहे हे तपासण्यासाठी हवामान विभागाकडून विविध प्रयोग केले जातात. त्यातीलच एका प्रयोगातील हे यंत्र असल्याचा अंदाज आहे. अशात सध्या पावसाळा सुरू असल्याने काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटत आहे. वाऱ्यामुळेच हे यंत्र तुटून खाली पडल्याची शक्यता वर्तवली जातेय. आता पुणे हवामान विभागाकडून याची तपासणी सुरू असून काय माहिती समोर येते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: खुशखबर! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

Crime: शाळा सुटल्यावर एकटीला गाठायचा, सोबत नेऊन...; ३ वर्षांच्या चिमुकलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

HSC, SSC Exam : आता ३५% नव्हे तर ३३ टक्के काठावर पास, दहावी-बारावीच्या मुलांसाठी कुणी घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT