Anil Parab On Lok Sabha Candidates | महायुतीने अखेरीस मुंबईतील उमेदवार जाहीर केलेत. शिवसेना संपली, रसातळाला गेली, शिल्लक राहिली नाही अशा सतत आरोळ्या ठोकणाऱ्या म्हणजे एकनाथ शिंदे गटाला उमेदवार जाहीर करावे लागले. उमेदवारी देताना भ्रष्टाचार ही मेरिट होती का? हे भाजपने सांगावं. सोमय्या यांनी देखील सांगितलं आहे की भाजपच्या सांगण्यावरून आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपला त्यांचा भ्रष्टाचार मान्य होता का? असा सवाल अनिल परबांनी केलाय. आता भाजपशी प्रामाणिक असणाऱ्यांऱ्यांनी काय करायचं? त्यांनी आता सतरंज्या उचलायचं काम करा असा टोलाच परबांनी लगावलाय...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.