पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्वच गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्या नागरिकांना ऑफिसला पोहचण्यासाठी उशिर होत आहे.
पश्चिम रेल्वेवर सध्या 6 व्या मार्गीकचे काम सुरु आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे. यादरम्यान सिग्नलच्या ट्रायलसाठी रेल्वेच्या प्रतिदिन 150 फेऱ्या कमी केले आहेत. सोमवार ते मंगळवारपर्यंत या फेऱ्या रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने या बद्दल एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या 6व्या मार्गिकेचे बांधकाम सुलभ करण्यासाठी, 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्री गोरेगाव येथे UP आणि DOWN फास्ट आणि मालाड येथे UP आणि DOWN फास्ट आणि स्लो मार्गांवर 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ऑक्टोबर 2024
आज सोमवार असल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्व चाकरमाणी प्रवासासाठी घराबाहेर पडतात. सकाळी कामावर आलेल्या वक्ती ५ नंतर घरी निघतील. अशात लोकल फेऱ्या रद्द झाल्याने नागरिकांना ठरावीक गाड्यांमधून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे आज जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.