Water Level of Jayakwadi Dam Saam TV
Video

Jayakwadi Dam Water : गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला, जायकवाडी जलाशयात किती टक्के पाणीसाठा? वाचा आकडेवारी

Paithan Jayakwadi Dam Water Leval : जायकवाडीत जलाशयात सध्या 51 हजार क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे.

Satish Daud

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. परिणामी नदीला मोठा पूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढलाय. आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा 63 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या 51 हजार क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 70 टक्क्याच्या दिशेने इकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाच्या वरच्या भागांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यात मागच्या चार दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.

त्यामुळे जायकवाडी धरणांचा पाणीसाठा हा झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे नाशिकमधील गोदावरीला आलेला पूर ओसरलाय. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय.

धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला. रामकुंड, गोदा घाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र नाशिकला अद्यापही मुसळधार पावसाचा इशारा कायम असून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT