Rescue team evacuating trapped farmers from Painganga river in Washim district using boats during a late-night flood rescue mission. saam tv
Video

Washim News: अखेर त्या 5 जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढले, पाहा VIDEO

Washim Flood Rescue: वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि उतावळी नद्यांना पूर आला असून वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या पाच नागरिकांना प्रशासन व नागरिकांच्या मदतीने सुखरूपपणे वाचवण्यात आले.

Omkar Sonawane

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी अडकलेल्या पाच जणांना रेस्क्यू करून वाचवण्यात आले. यात रिसोड तालुक्याच्या पेडगाव येथे पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय अंभोरे आणि मदन मोरे अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे शेतकरी शेतात गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पैनगंगा नदीला मोठा पूर आला. जीव वाचवण्यासाठी दोघे शेतकरी शेतातील एका झाडावर चढले आणि ते दुपारपासून तेथे अडकून पडले होते.

तर दुपारच्या सुमारास कोकसा परिसरात उतावळी नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती अडकून पडला होता. त्या व्यक्तीला शिरपूर पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर उतावळी नदीच्या पुरात जोगेश्वरी शेत शिवारात सुद्धा दोन शेतकरी पुरात अडकून पडले होते यांना सुद्धा शिरपूर पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. संत गाडगेबाबा रेस्क्यू टीम, पिंजर यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. बोटीद्वारे बचाव मोहीम राबवून दोन्ही शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT