Floodwaters from Utawali River submerge the bridge near Pimpiri Sarhad, halting all vehicular traffic on the Nagpur-Sambhajinagar highway in Washim district. saam tv
Video

Washim News: वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; उतावळी नदीला पूर, नागपूर-संभाजीनगर महामार्ग ठप्प|VIDEO

Washim Flood Traffic Jam And Rescue Efforts: वाशिम जिल्ह्यात २० तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उतावळी नदीला पूर आला आहे. नागपूर-संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Omkar Sonawane

वाशिम जिल्ह्यात गेल्या २० तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

विशेषतः नागपूर–संभाजीनगर महामार्गावर असलेल्या पिंपरी सरहद्द गावाजवळील उतावळी नदीला पूर आल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जवळपास सहा ते सात तासांपासून वाहतूक ठप्प असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT