A poster of convict Valmik Karad spotted at Pankaja Munde’s Dussehra rally in Beed, sparking political controversy. Saam Tv
Video

Walmik Karad: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; बीडमध्ये राजकीय खळबळ|VIDEO

Pankaja Munde Dussehra Rally: बीड जिल्ह्यातील सावर्भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात तुरुंगात शिक्षा भोगत असलेले वाल्मिक कराड यांचे पोस्टर झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याने मुंडे यांना देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आज दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा सुरू असताना वाल्मिक कराडचे बॅनर झळकले. या पोस्टरवर 'We Support Walmik Anna, कराड आमचे दैवत असा मजकूर झळकत होता. कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मीक कराडचे पोस्टर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT