Bandra-Worli sea link Saam
Video

Bandra-Worli sea link : २५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी, मुंबईतील सी लिंकवरील व्हिडिओ

Lamborghini Mumbai's Bandra-Worli sea link : मुंबईच्या वांद्रे–वरळी सी लिंकवर लँबर्गिनी कार २५० किमी प्रतितास वेगाने चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

Lamborghini Mumbai's Bandra-Worli sea link : वांद्रे–वरळी सी लिंकवर धोकादायक वाहन चालवण्याचा थरार समोर आला असून, तब्बल 250 किलोमीटर प्रतितास वेगाने कार चालवल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेली मोटार कार क्रमांक HR 70 F 1945 ही सुपर वेल कॉमट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती आहे.या कारचा मालक नीरव पटेल (रा. अहमदाबाद) असून, कार चालवणारा फैज एडनवाला (वय 36, रा. खार पश्चिम, मुंबई) असल्याचे तपासात उघड झाले आहे.फैज एडनवाला हा कार डीलर असून, कार मालकाने तात्पुरत्या स्वरूपात वाहन त्याच्याकडे दिले होते. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT