Ajit Pawar Election Commission SaamTv
Video

Ajit Pawar News : अजितदादांकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग? बघा काय आहे प्रकरण

Election Commision : विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधीच आता आचारसंहिता भंगाचे किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांच्या भंगाचे प्रकार समोर यायला लागले आहेत.

Saam Tv

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्यात आला आहे. ईव्हीएम प्रचार रथाचं अजितदादांनी उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन प्रकरणीच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांना नोटीस बजावली आहे. पुण्याच्या खेड आळंदीमधील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा अडचणीत आल्याचं दिसतं आहे.

विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधीच आता आचारसंहिता भंगाचे किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांच्या भंगाचे प्रकार समोर यायला लागले आहेत. राज्यातला हा पहिलाच प्रकार आहे, आणि तो देखील थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा भंग केला आहे. पुण्याच्या खेड आळंदी येथे अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या जनजागृती ईव्हीएम प्रचार रथाचं उद्घाटन केलं आहे. या प्रकरणाची जिल्हा निवडणूक शाखेने गंभीर दखल घेत तहसिलदार आणि प्रांत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र अजित पवार यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्याकडून खुलासा मागवला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT