Villagers of Kurduwadi protest after police cases filed in illegal mining row involving Ajit Pawar’s viral phone call to IPS officer. Saam Tv
Video

IPS Officer Anjana Krishna: गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन उभारू; ग्रामस्थ संतापले, नेमके प्रकरण काय? VIDEO

Atul Khupse Farmers Union Warns: कुर्डुवाडीत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी बेकायदेशीर खनिज उत्खननावर कारवाई केली. त्यानंतर ग्रामस्थांनी गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा संतप्त इशारा दिला.

Omkar Sonawane

महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मोबाईल फोनवरून तंबी दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांच्यासह 15ते 20 जणांवर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती आयपीएस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जावून कारवाई सुरू केली. दरम्यान गावातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. कार्यकर्त्यांच्या फोन वरून अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई करू नका असे म्हणत तंबी दिली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.

यावर विरोध पक्षातील अनेकांनी अजित पवार यांच्या कृतीवर आक्षेप घेत टिका केली. तर जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी बाबा जगताप नितीन माळी,संतोष कापरे,आण्णा ढाणे यांच्या 15ते 20 जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT