Nanded Flood Video Saam Tv
Video

Nanded Flood Video: नाल्याच्या पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत सुटका; व्हिडीओ समोर...

Nanded Rain News: नांदेडमध्ये सध्या तुफान पावसाची बॅटींग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान या नाल्याच्या पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत सुटका करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Jyoti Kalantre

नांदेड: जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नांदेडमधील ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. आणि या पुरात काही विद्यार्थी अडकले होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी परतत असताना अचानक नाल्याला पूर आला आणि सर्व विद्यार्थी या पुरात अडकले. दरम्यान सर्व गावकऱ्यांनी मानवी साखळी करत या सर्व विद्यार्थ्यांची सुटका केली. रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी यासाठी अनेक वर्षांपासून हे गावकरी मागणी करत आहेत.परंतु अद्याप त्यांची ही मागणी पूर्ण झाली नसल्याने पावसाळ्यात नाल्याला पूर आला की या सर्व गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT