Vilas Shinde heads to Mumbai with a convoy of hundreds of vehicles; to join Shinde Sena in presence of Eknath Shinde with a symbolic silver sword. saam tv
Video

Maharashtra Politics: शेकडो वाहनांचा ताफा, चांदीची तलवार; विलास शिंदें भव्य शक्तिप्रदर्शनासह मुंबईला रवाना, ठाकरे गटाला मोठा दणका|VIDEO

Hundreds of Vehicles: विलास शिंदे यांनी शेकडो वाहनांसह शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे कूच केली असून, आज ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांनी चांदीची तलवारही भेट देणार आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्याचवेळी विलास शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील असे वृत्त होते. अखेर तो दिवस आज उजाडला असून नाशिकहून शेकडो वाहनांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन करत आज मुंबईला रवाना होत आहे. विलास शिंदे यांच्यासोबत 8 माजी नगरसेवक, 12 जिल्हा परिषद सदस्य, 40 हून अधिक सरपंच, जिल्हा बँक, बाजार समितीचे आज माजी पदाधिकारी करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सुधाकर बडगूजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने ठाकरे गटाला अवघ्या एक महिन्यात दूसरा मोठा दणका मानला जात आहे.

पक्षप्रवेशाला जाण्यापूर्वी विलास शिंदे साम टीव्हीशी संवाद साधताना म्हणाले की, तीस वर्षांपासून शिवसेनेत काम करतो आहे. 1996 पासून शाखा प्रमुख आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाहीये. साडे तीन वर्षापूर्वी शिवसेनेत गट पडले. आमच्या समोर त्यांची प्रतिमा चुकीची दाखवली गेली. पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे कामे घेऊन गेलो तेव्हा एकनाथ शिंदेंनी आमचा पक्ष, गट नाही बघितला आमचे कामे केले. तेव्हा आमच्या लक्षात आले की बाळसाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहे असे स्तुतिसुमन शिंदेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर उधळली आणि ज्या शिवसेनेत आम्ही 30 वर्ष कामे केली. त्यांनी आमच्या कामाचे मूल्यमापनच केले नाही अशी खंतही त्यांनी ठाकरे गटाप्रति बोलून दाखवली. दरम्यान आज पक्ष प्रवेशावेळी विलास शिंदे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार देखील भेट देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT