Maharashtra Politics: नाशिकमध्ये पुन्हा बडगुजर पॅटर्न! महानगर प्रमुख विलास शिंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी|VIDEO

Nashik political news Vilas Shinde Thackeray Sena expulsion: नाशिकमध्ये ठाकरे गटाने विलास शिंदे यांची हकालपट्टी केली असून ते रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 'बडगुजर पॅटर्न'नुसार महानगरप्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिंदे सेनेत जाणार असल्याची संकेत दिल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. येत्या रविवारी दिनांक 29 रोजी हा पक्षप्रवेशब होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटाने बडगुजर पॅटर्न वापरत विलास शिंदे यांच्या ऐवजी मामा राजवाडे यांची नियुक्ती करून विलास शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान रविवारी होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्यात एका माजी महापौरासह काही माजी नगरसेवकदेखील प्रवेश करणार आहे. विलास शिंदे यांनी गुरुवारी समर्थकांचा मेळावा घेतला, त्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सत्तेतील पक्षात जा, असे सांगताना भाजप ऐवजी शिंदे गटात जाण्याचा सल्ला दिल होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com