Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule announces the launch of e-Bonds as Congress leader Vijay Wadettiwar reacts. Saam Tv
Video

ई-बाँडची घोषणा करताच विरोधकांचा हल्लाबोल; पाहा VIDEO

Vijay Wadettiwar Criticism On Maharashtra E-Bond Decision: महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत स्टॅम्प पेपरऐवजी ई बाँड प्रणाली लागू केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली तर विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर टीका केली.

Omkar Sonawane

महाराष्ट्र सरकारने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता कागदी बाँडची आवश्यकता राहणार नाहीये. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावरच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बाँड सुरू करतेय. ई प्रणालीच्या माध्यमातून स्टॅम्प पेपर न घेता तुम्ही ई बाँडवर सर्व काम करू शकतात.

राज्यातील हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे. तसेच आता आमचे सरकार हे ई बाँडवर आलेलं आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर यावरच कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, यामध्ये ऐतिहासिक असे काय आहे. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे. त्यामुळे सगळीकडेच त्याचा वापर सुरू होतोय. कालांतराने हे सगळे होत असते त्यामुळे आपण खूप असे मोठं काही करतोय असे समजण्याचे कारण नाही असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT