VIJAY WADETTIWAR SHARAD PAWAR NEWS AI image
Video

Vijay Wadettiwar : ...तर मी शरद पवारांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन; असं का म्हणाले वडेट्टीवार? पाहा Video

Vijay Wadettiwar Political News : डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकारण तापले आहे. शरद पवार यांनी या विधेयकाला विरोध केल्यास जाहीरपणे माफी मागून त्यांच्या पायावर डोके ठेवेन, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Alisha Khedekar

सध्या देशभरातील राजकारणात डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा सुरु आहे. या विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असून या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवार यांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. सत्तेसाठी जगायचे आणि सत्ता घेऊन मरायचे, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात असतो, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी आपल्या विधानाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे.

शरद पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला, तर मी त्यांची जाहीरपणे माफी मागेन. एवढेच नाही, तर त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. माझा शरद पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे पवार साहेबांनी देशाच्या लोकशाहीचा विचार करून या विधेयकाला पाठिंबा देऊ नये, अशी हात जोडून विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका तासाच्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले; काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश?

Matheran news : माथेरानच्या मिनी ट्रेनच्या रुळांवर कार कोसळली! थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

गुजरातच्या राजकारण्यांविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला; माजी IPS अधिकाऱ्याचा दाव्यानं खळबळ

फोटोमध्ये फुलपाखरू ससा आणि माकड लपलेले आहेत, १० मिनिटांत शोधून दाखवा

Maharashtra News Live Update: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला आम आदमी पक्षाचा विरोध

SCROLL FOR NEXT