Sagar Moholkar Saam Tv
Video

Sagar Moholkar: कुख्यात गुंड सागर मोहोळकरचा जुना VIDEO व्हायरल, तरुणाला भरचौकात बेदम मारहाण

Sagar Moholkar Video: गुंड सागर मोहोळकरवर बुधवारी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर मोहोळकरचा एक जुना व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सागर मोहोळकर या पैलवानावर बुधवारी रात्री जामखेड शहरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये सागर मोहोळकरला चार गोळ्या लागल्या असून त्याच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. चार गोळ्या लागूनही सागर मोहोळकर अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे. सागर मोहोळकरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

पैलवान असलेला सागर मोहोळकर हा कुख्यात गुंड म्हणून जामखेड तालुक्यात त्याची ओळख होती. त्याच्यावर खंडणी, मारहाण करणे, जिवे मारणे, जीव मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याने धाराशिवमध्ये जत्रेच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत गुंड निलेश गायवळच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर तो अनेकांच्या टार्गेटवर होता. त्याच्यावर झालेल्या गोळीबारात मागच्या वादाचे काही धागेदोरे आहेत का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी सागर मोहोळकर यांच्या वडिलांनी सागर त्याच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनमध्ये महाराणीची तक्रारही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT