Vice President Election India 2025 : भारतीय उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून आज याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण सांगत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता या पदावर निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, उपराष्ट्रपतिपद ९ सप्टेंबर रोजी भरले जाईल. वेळापत्रकानुसार २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारांचे नामांकन स्वीकारले जातील. ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, त्याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. “Vice President of India election date 2025 announced by Election Commission”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.