Vasai-Virar saam tv
Video

Rain News: वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग; नालासोपारा पेल्हार फाटा जलमय|VIDEO

Heavy Rain Batters Vasai-Virar: वसई-विरार शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून नालासोपारा पेल्हार फाटा रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

विरार शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा नालासोपारा पेल्हार फाटा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून, व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नागरिक आणि वाहनचालकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत असून, त्यांचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे.

काही सतर्क नागरिकांनी गटारांचे झाकण उघडून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्यांची पहिल्याच पावसात पोलखोल झाल्याचं चित्र दिसत आहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, तर नागरिकांनी तात्पुरती खबरदारी घेत आपली वाट शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीराबाई चानूने पटकावलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: पक्षवाढीसाठी रश्मी ठाकरे मैदानात, भाजपच्या सुश्मिता भोसलेंचा ठाकरे सेनेत प्रवेश

Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

Flight Missing: धक्कादायक! आकाशात जाताच गायब झालं विमान; २२ दिवसापूर्वी केलं होतं उड्डाण

Rohit Pawar On Sanjay Shirsat: नवी मुंबईतील जमीन घोटाळा भोवणार? मंत्री शिरसाटांचा पाय आणखी खोलात?

SCROLL FOR NEXT