Varah jayanti nitesh rane performed Arti in Mumbai  saam tv
Video

varaha jayanti : मुंबईत वराह जयंती साजरी, नितेश राणेंकडून आरती, VIDEO

Varaha Jayanti 2025 : मुंबईतील चेंबूरमध्ये वराह जयंती साजरी करण्यात आली. राज्याचे मंत्री नितेश राणेंनी वराह जयंतीच्या कार्यक्रमात आरती केली.

Nandkumar Joshi

राज्यभरात वराह जयंती साजरी करायला हवी, अशी मागणी करणारे राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबईतील चेंबूरमधील वराह जयंतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी राणेंच्या हस्ते या जयंती उत्सवात आरती करण्यात आली. आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हिंदू समाजात एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचं बोललं जातंय.

काय म्हणाले होते नितेश राणे?

मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. २५ ऑगस्टला संपूर्ण राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी त्यांनी केली होती. वराह जयंतीनिमित्त जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचीही विनंती केली होती. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू सण साजरे करणार, असं ते म्हणाले होते. हे हिंदूंचे सरकार आहे. मोठ्या बहुमतानं हे सरकार हिंदूंनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आमचे सण धुमधडाक्यात साजरे करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Festival : तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना; ५० फूट दगडी विहिरीच्या कमानीत बाप्पा विराजमान

Manoj Jarange Morcha: मनोज जरांगेंच्या मोर्चामुळे पुणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

अबब! गुजरातमध्ये 'बेनाम' पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या, निवडणूक आयोग पुन्हा राहुल गांधींच्या निशाण्यावर

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना; पत्नी सुमित्रा म्हणाल्या, ही शेवटची लढाई|VIDEO

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

SCROLL FOR NEXT