Vanchit Protest SaamTv
Video

VBA Protest : शाह यांच्या 'त्या' वक्तव्यावर वंचितचा आक्रमक पवित्रा

Amit Shah News : गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मुंबईत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

Saam Tv

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत देखील महानगर पालिकेच्या इमारतीसमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक गोळा झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. विरोधीपक्षांकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच राज्यातील सर्व आंबेडकरवाडी संघटनांनी एकत्र येत भाजप आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आंदोलन छेडलं आहे. याच संदर्भात आज दुपारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या इमारती बाहेर मोठ्या संख्येने जमा होत वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT