Vaishnavi Hagwane saam tv
Video

Vaishnavi Hagwane: वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या जप्त, हगवणे अजून खोलात|VIDEO

Silver Utensils Recovered From Vaishnavi Streedhan: वैष्णवीच्या हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणेकडील पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर अनेक दिवसांपासून हगवणे पिता पुत्र हे पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्यांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अशातच आज या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

आज रोजी गुन्हा राजि नंबर 206/ 25 चे तपासात वैष्णवीचे दोन भाऊ विराज व पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले . तसेच स्त्रीधन म्हणून वैष्णवी हीच दिलेली चांदीची भांडी (पाच ताटे ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट ) .जप्त करण्यात आले आहे.

आरोपी सुशील हगवणे व शशांक हागवणे यांच्याकडे परवाना शस्त्र असल्याने ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले त्यामध्ये एक पिस्तूल व एक वेबले कंपनीचे रिवॉल्वर आहे. तसेच आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन इंडिवर गाडी ही देखील जप्त करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT