Maha Kumbh 2025 SaamTv
Video

Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाला आली जाग, केले 'हे' ५ बदल

Maha KumbhMela Changes In Management : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून महत्वाचे पाच बदल केले आहे.

Saam Tv

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता खबरदारी म्हणून नियोजनात काही बदल केलेले आहेत. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने आता प्रशासनाला जाग आलेली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलत ५ मोठे बदल केलेले आहेत. तसच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस महासंचालक आणि सचिवांना कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यास सांगितलं आहे.

यापुढे महाकुंभमेळ्याच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास आता मनाई करण्यात आलेली आहे. तसंच VVIP पास देखील रद्द करण्यात आलेले असून कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयागराजच्या शेजारील जिल्ह्यांमधून येणारी वाहनं जिल्ह्याच्या सीमेवर थांबवण्यात येणार आहे. तर ४ फेब्रुवारीपर्यंत शहरात चारचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Feng Shui Turtle : भरपूर पैसा, नातंही फुलेल, 'ही' १ गोष्ट करेल घराचं गोकुळ; वास्तूशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

Pitrupaksh 2026 : पितृपक्षात 'या' ६ वस्तू चुकूनही खरेदी करू नका, पूर्वज होऊ शकतात नाराज

Maharashtra News Live Update: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

Maharashtra MLC Election: पाच जागा, दावेदार अनेक! महायुतीत जागावाटपावरून चढाओढ; राजकीय मोर्चेबांधणीला वेग

Actor Hospitalized: 'भाभीजी घर पर हैं'फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; ICUमध्ये उपचार सुरू, बहिणीची मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT