LUCKNOW GAMING ZONE FIRE: 15 DEAD, PEOPLE JUMP FROM WINDOWS TO ESCAPE | VIDEO VIRAL saam tv
Video

गेमिंग झोन सेंटरला भीषण आग; १५ जणांचा होरपळून मृत्यू,जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या खिडकीतून उड्या|Video Viral

Lucknow Fire : लखनौमधील एका गेमिंग झोनच्या इमारतीत भीषण आग लागली. यात १५ जणांचा मृत्यू झाला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी खिडक्यांतून उड्या मारल्या.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील अलीगंज भागात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास एका इमारतीमधील कोचिंग सेंटरला भीषण आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण करत इमारतीला आपल्या विळख्यात घेतलं यात १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि हायड्रॉलिक शिड्या असलेली वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्यानंतर अनेक लोक इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले असले, तरी काही जण आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तींचे वय २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. काही मिनिटांतच संपूर्ण इमारत धूर व आगीच्या विळख्यात सापडली. आग लागताच परिसरात घबराट उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT