kanpur court clash viral video Saam tv
Video

कोर्टात मोठा राडा; दोन वकिलांमध्ये जुंपली, एकाने शर्ट काढून व्यक्त केला संताप, व्हिडिओ व्हायरल

kanpur court clash viral video : उत्तर प्रदेशातील कानपूर कोर्टात मोठा राडा झाला. एका वकिलाने शर्ट काढून दुसऱ्या वकिलावर संताप व्यक्त केला.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोर्ट परिसरातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोन वकिलांमध्ये बाचाबाची झाली. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, एका वकिलाने भर कोर्टात शर्ट काढून संताप व्यक्त केला. एका वकिलाचा पक्षकार दुसऱ्या वकिलाने त्याच्याकडे वळवून घेतल्याचा कारणावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर कोर्टातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वकिलाने कोर्ट परिसरातच राडा केल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अनेक जण न्यायाची अपेक्षा घेऊन कोर्टात येतात, त्याच ठिकाणी दोन वकिलांमध्ये राडा झाल्याने अनेक जण चकीत झाले. वादानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. बार असोसिएशनने दोन्ही वकिलांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. आता दोन्ही वकिलांवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT