Donald Trump Tariffs saam tv
Video

Trump's global tariffs : ग्लोबल टॅरिफ बेकायदेशीर... डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका, VIDEO

US Supreme Court rejects Trump's global tariffs : ग्लोबल टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं असून, ते रद्द करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे.

Nandkumar Joshi

अवाजवी टॅरिफ लादून जगातील अनेक देशांना बेजार करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं जोरदार झटका दिला आहे. ट्रम्प यांनी लादलेले ग्लोबल टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफविरोधात हा निर्णय दिला आहे.

आपत्कालीन अधिकारांचा वापर करून अमेरिकी व्यापारी भागीदार देशांवर अशा प्रकारे जादा शुल्क लादण्याचा त्यांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे. तसेच ट्रम्प यांचे अन्य आयात शुल्क प्रस्तावही रद्द करण्याचा निर्णय दिला. यामुळे ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्यालाच मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

याबाबत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे म्हणाले की, ''ग्लोबल टॅरिफ रद्द करून अमेरिकी सुप्रीम कोर्टानं ट्रम्प सरकारला मोठा झटका दिला आहे. मुख्यतः जगातील विविध देशांवर ट्रम्प सरकारनं टॅरिफ लादला होता. ट्रम्प यांच्या या धोरणामुळं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून अमेरिकेची जी ओळख होती, तिला एकप्रकारे धक्का बसला होता. आता भारतावर या निर्णयाचे नेमके कोणते सकारात्मक परिणाम होतात, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT