Trump tariff on Chinese imports 
Video

Tariff War : व्यापार युद्ध पेटलं, अमेरिकेनं चीनवर १०४ टक्के टॅरिफ लावला

Trump tariff on Chinese imports : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनवर मोठी कारवाई. चीनकडून ३४% टॅरिफ मागे न घेतल्याने ट्रम्प प्रशासनाने १०४% आयात शुल्क लावले.

Namdeo Kumbhar

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर तब्बल १०४% टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याचा निर्णय घेतला. आज, ९ एप्रिलपासून नवा टॅरिफ लागू होणार असल्याची माहिती व्हाइट हाउसने दिली. या निर्णयामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही देशांमधील व्यापारी युद्ध आता नव्या टप्प्यात पोहोचले आहे. या टॅरिफमुळे अमेरिकन बाजारात चिनी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, तर चीनमधील निर्यात क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. १० एप्रिलपासून चीनने अमेरिकेन वस्तूंवर ३४ टक्के टॅरिफ लागू केला होता. चीनने अमेरिकन वस्तूंवरील ३४% टॅरिफ मागे घेतला नाही, तर कठोर पावले उचलली जातील. असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला होता. या धमकीनंतर अवघ्या ४८ तासांतच ट्रम्प प्रशासनाने हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "जे कोणी अमेरिकेविरुद्ध प्रतिशोधात्मक कारवाई करेल, त्याला त्याहून अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. व्यापारात अन्याय सहन केला जाणार नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT