Shruti Vilas Kadam
हे पावसाळ्यात उपयुक्त आणि अतिश छोटे इलेक्ट्रिक गॅझेट आहे. यामुळे काही मिनिटांत कपडे सुकवण्यासाठी मदत होते. या गॅझेटला जास्त जागा लागत नाही. फोल्ड आणि पोर्टेबल करण्यायोग्य असतात. एकाच वेळी 12 ते 15 कपडे सहज सुकवू शकते.
पावसाळ्यात हवामान दमट असते त्यामुळेच कपडे लवकर सुकत नाहीत. हे गॅजेट हवेतील ओलावा कमी करून कपडे लवकर सुकवण्यास मदत करते.
पंख्याद्वारे गरम हवा फेकल्यामुळे कपड्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि कपडे लवकर सुकतात. लांब, कमी जागा व्यापणारा असल्यामुळे पोर्टेबल असल्याने कुठेही नेता येते.
पावसाळ्यात आणि थंडीत हवामान थंड असते. थंडीत खोलीत ऊब निर्माण करण्यासाठी आणि पावसात कपडे सुकवण्यासाठी याचा वापर केला जातो.
या गॅझेटमध्ये कपडे वाळवण्यासाठी स्टँड आणि इनबिल्ड फॅनचे कॉम्बिनेशन असते. रॅकला जोडलेले पंखे कपड्यांवर सतत हवा सोडतात ज्यामुळे कपडे लवकर सुखतात.
यावर कपडे सुकवता येत नाही पण साधारण ओले कपड्यांवर ही इस्त्री फिरवता येते आणि कपडे घालण्यायोग्य होतात.
हे गॅझेट पावसाळ्यात ओले कपडे किंवा बूट सुकवण्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल, स्मार्ट, इलेक्ट्रिक गॅझेट आहे. यातून गरम हवा बाहेर येते त्यामुळे कपडे लवकर सुकतात. ते सामान्य हँगरसारखे असते जे कुठेही सहज अडकवू शकतो.
हे एक हलके, कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल इलेक्ट्रिक क्लॉथ ड्रायर आहे, जे प्रवासात किंवा पावसाळ्यात पटपट कपडे सुकवण्यासाठी वापरले जाते. विशेषत लहान मुलांच्या कपड्यांसाठी वापरले जाते.