Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा म्हणजे पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्यात या यात्रेला सुरूवात होते.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून या पालखी आषाढी एकदशीला पंढरपूरला प्रस्थान होतात. या पालखीच्या प्रवासाला २१ दिवसांचा कालावधी लागतो.
वारीला ७०० ते ८०० वर्षाहून अधिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतू तुम्हाला माहितीये का? वारीची सुरूवात कशी झाली?
अख्यायिकेनुसार, वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून सुरू झाली, असे मानले जाते. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः दरवर्षी पंढरपूरची वारी करत असत.
संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर, संत नामदेव महाराजांनी या वारीच्या परंपरेला व्यापक स्वरूप दिले. संत नामदेवांच्या अभंगांतून आणि त्यांच्या कार्यातून वारीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांना तीर्थयात्रा सुरू केल्याचे श्रेय दिले जाते. तेव्हापासून आजपर्यंत वारीची ही परंपरा अखंड सुरू आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला द्या.