Uran News SaamTv
Video

Uran News : माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? उरणच्या सरपंचाचा पोलिसांना सवाल | VIDEO

Sarpanch Kunal Patil Video Viral : उरणच्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कारवाई कधी करणार असा सवाल करत उरण मस्साजोगच्या वाटेवर असल्याचं सरपंच कुणाल पाटील यांनी म्हंटलं आहे.

Saam Tv

उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. माझा संतोष देशमुख होण्याची वाट पोलीस बघत आहेत का, असा संतप्त सवाल पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. गावगुंडांच्या दहशतीमुळे गावकरी प्रचंड घाबरले आहेत. उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवर जाण्याची भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

याबद्दल कुणाल पाटील यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, दोन महिन्यांपूर्वी माझ्या कार्यालयाजवळ गावागुंडानी हल्ला केला होता. या गावगुंडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मी उरण पोलीस ठाण्यात गेलो मात्र पोलिसांनी केवळ एनसी दाखल करून घेतली. न्याय मिळवण्यासाठी मी न्यायालयात गेलो. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गंभीर गुन्हे दाखल होऊन देखील अद्याप गावगुंड मोकाट फिरत आहेत. उरण पोलीस असा कोणता तपास करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेप्रमाणे माझा संतोष देशमुख होण्याची वाट उरण पोलीस बघत आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी व्हिडिओमधून उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT