Pune Rainfall Saam Tv
Video

Pune Rain: हिवाळ्यात पावसाळा! पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं, बळीराजा चिंतेत

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. मंचर आणि कळंब परिसरात रात्रीच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.

Priya More

हिवाळा सुरू असताना पुणेकरांना पावसाचा अनुभव घ्यायला मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या मंचर आणि कळंब परिसरात रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

यावेळी पावसाचा जोर कमी असला तरी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचले. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होणार असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT