Ulhasnagar Municipal Election News Saam Tv
Video

Exit Poll : उल्हासनगरमध्ये शिंदेंचं वर्चस्व, पण सत्तेसाठी भाजपला सोबत घ्यावं लागणार?

Ulhasnagar Municipal Election Exit Poll News : २९ महानगरपालिका निवडणुकांचे मतदान पार पडले असून साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अंतिम निकाल उद्या जाहीर होणार आहे.

Alisha Khedekar

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेने सत्तेसाठी चांगलाच जोर धरला होता. त्यांना टक्कर देण्यासाठी मराठी कार्ड वापरून यावेळेस ठाकरे बंधू युती करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उद्या २९ महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे.

तत्पूर्वी साम टीव्हीने संभाव्य एक्झिट पोल सांगितले आहेत. बऱ्याच ठिकणी भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार, उल्हासनगरमध्ये भाजपाला २८, शिंदे सेनेला २९ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाला ४ जागा मिळू शकतात असे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच इतरांच्या स्थानिक जागा आहेत त्यांना १२, काँग्रेसला २, ठाकरेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १५, तर मनसेला २ जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची अतितटीची चुरस पाहायला मिळाली. दरम्यान शिंदे सेनेचं पारडं अधिकाधिक जड होण्याची शक्यता आहे. हा संभाव्य निकाल असून आज झालेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

Rahul Gandhi : नरेंद्र मोदी 100 टक्के ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये; राहुल गांधींचा दावा

SCROLL FOR NEXT