solapur news  saam tv
Video

Ujani Dam Pipline: सोलापूर-पुणे महामार्गावर पाईपलाईन फुटली; 40 फुट उंच पाण्याचे फवारे|VIDEO

Solapur-Pune National Highway Flooded: उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या पाईपलाईनला गळती लागली आहे. यामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे उडताना दिसत आहे.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर: येथील उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना आज सकाळी घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे पाहायला मिळाले, त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

ही गळती सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये, लंबोटी गावाजवळील चंदननगर भागात आढळून आली. या फुटलेल्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. साधारण अर्ध्या तासापासून ही गळती सुरू आहे. पाण्याचा जोर इतका होता की रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच उजनी धरण ते सोलापूर दरम्यानच्या या दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. मात्र इतक्या लवकर पाईपलाईन फुटल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT