Historic unity at Shivaji Park as Uddhav and Raj Thackeray address a massive crowd, creating a strong political wave in Mumbai. Saam tv
Video

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Uddhav–Raj Thackeray Rally Shivaji Park: मुंबईतील ऐतिहासिक क्षण आहे. उद्धव आणि राज ठाकरे हे २० वर्षांनंतर शिवाजी पार्कवर एकत्र येणार आहेत. दोन्ही बंधूंची ही दुसरी संयुक्त सभा आहे. याआधी नाशिकमध्ये दोन्ही बंधूंनी संयुक्त संभा घेतली होती.

Bharat Jadhav

तब्बल 20 वर्षांनंतर मुंबईमधील शिवाजी पार्कावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होतंय. या सभेमधून राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणून कोणती पोलखोल करणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय. राज ठाकरे भाजपवर काय घणाघात करणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान उद्धव-राज ठाकरे यांच्या सभेला मुंबईच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते शिवाजी पार्कावर जमत आहेत.

हातात मोठं मोठं बॅनर घेतलंय. मराठी माणसांचे सुरक्षाकवच म्हणजे ठाकरे, भाऊकी जोमात, विरोधक कोमात अशा आशयाचे बॅनर कार्यकर्ते दाखवत आहेत. कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपवर हल्लाबोल केलाय. ठाकरे हे मराठी माणसांचे सुरक्षा कवच आहेत. दोन्ही बंधू एकत्र आल्याने महायुतीचे नेते कोमात गेलेत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या. जे मराठी माणसांचे लचके तोडतात ठाकरे बंधू त्यांच्या उरावर बसतात. तर दोन्ही बंधू एकत्र आल्याने विरोधकांची अवस्था वाईट झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

Ladki Bahin Yojana : पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होणार? सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT