Uddhav Thackeray Saam Tv
Video

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा प्रखर हिंदूत्वाकडे? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Uddhav thackeray News : बातमी ठाकरे गटानं संभाजीनगरात केलेल्या आंदोलनाची...ठाकरे गटावर हिंदूत्व सोडल्याचा घणाघात भाजपनं वारंवार केला.लोकसभेत ठाकरे गटाला अल्पसंख्याक मतं मिळाली. त्यानंतर ठाकरेंनी हिंदूत्व सोडल्याच्या चर्चेनं अधिकच जोर धरला..मात्र आता ठाकरे गट पुन्हा हिंदुत्वाचं राजकारण करताना दिसतोय...पाहूया एक रिपोर्ट..

Tanmay Tillu

बांगलादेशात राहणाऱ्या हिंदुंवर सातत्याने होणारा अन्याय, अत्याचार आणि दडपशाही विरोधात शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय. या अत्याचारांच्या निषेधार्थ ठाकरे गटानं संभाजीनगरात आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत क्रांती चौक दणाणून सोडलं. भारतातल्या बांगलादेशींविरोधातच ठाकरे गटानं आता जोरदार आघाडी उघडलीय. यावेळी दानवेंनी राज्यातील बांगलादेशींना शोधून परत पाठवण्याची मागणी केली. तर भाजपनं त्यांच्या या आंदोलनाची खिल्ली उडवल उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्रि‍पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हापासून विरोधकांकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातोय. लोकसभा निकालातही अनेक मुस्लिम बहुल भागातून ठाकरे गटाला भरभरून मतदान झालं होतं, त्याचाच आधार घेत भाजपासह शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटानं पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिलाय..त्यामुळे या आंदोलनातून ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची कास धरुन प्रखर हिंदुत्वाचं राजकारण करणार का की पुन्हा हिंदुत्वाचं राजकारण करुन भाजपला जवळ करण्याचा प्रयत्न असणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

SCROLL FOR NEXT