Uddhav Thackeray with Raj Thackeray during Ganeshotsav meet at Shivtirth residence, Mumba Saam Tv
Video

Thackeray Brothers: १० मिनिटं फक्त दोघेच शिवतीर्थावर होते, उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली? | VIDEO

Uddhav Thackeray & Raj Thackeray Ganeshotsav Meeting: गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंना भेटले. ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 10 मिनिटं चर्चा झाली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चेला अधिक वेग आला आहे.

Omkar Sonawane

गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र

दोन्ही बंधूंमध्ये तब्बल १० मिनिटं झाली चर्चा

यंदाच्या वर्षातली ही ठाकरे बंधूंची तिसरी भेट

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीला मोठं महत्त्व

गणेशोत्सवानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आज मंगळवारी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. यावेळी दोन्ही बंधूंमध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या वर्षभरात ही ठाकरे बंधूंची तिसरी भेट ठरली. यापूर्वी ५ जुलैला मराठी विजयी मेळाव्यात दोघेही एकाच मंचावर आले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन आले होते. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला यामुळे आणखी उधाण आले आहे. विशेष सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये युतीची जुळवाजुळव सुरू असून, गणेशोत्सवातील ही भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: मनासारख्या घटना घडतील; यशाची वाट सापडेल; या राशींसाठी गुरुवार भाग्याचा

Metro Mumbai 3 feeder bus Service : मेट्रो प्रवास आणखी सुकर होणार; प्रवाशांसाठी फीडर बससेवा सुरू, भाडे किती रुपये असणार?

Who Is Maithili Thakur: अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेच्या रिंगणात, कोण आहेत मैथिली ठाकूर?

Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

Diwali 2025: दिवाळीत घरात या शुभ वस्तू नक्की ठेवा, सुख-शांती आणि समृद्धी नांदेल

SCROLL FOR NEXT