Manasvi Choudhary
भारतीय क्रिकेट चाहत्याचं सर्व लक्ष काल इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावाकडे होते
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सुपर लीगमधील राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली त्याला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वीला अॅक्युट ग्रॅस्ट्रोएन्टेरिटिस पोटाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
मुंबई आणि राजस्थान सुपर लिंगच्या सामना संपल्यानंतर अचानक यशस्वीच्या पोटात दुखू लागले.
हा त्रास अधिकच वाढल्याने यशस्वीला तातडीने पिंपरी- चिंचवड येथील आदित्य बिर्ला रूग्णालयात नेण्यात आले आहे.
रूग्णालयात यशस्वीची आरोग्याची तपासणी केल्यानंतर त्याला ग्रॅस्ट्रोएन्टेरिटिस झाल्याचे निदर्शनास आले आहे. यशस्वीच्या सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड या तपासण्या झाल्या आहे.
माहितीनुसार सध्या यशस्वीची प्रकृती बरी असूण त्याला पूर्णत: विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.