Shreya Maskar
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचे जगभरात दिवाने आहेत. तिने हिंदीसोबत मराठी चित्रपटात काम केले आहे.
माधुरी दीक्षितने बेबी पिंक रंगाचा सुंदर वेस्टन ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर मोठे गुलाबाचे फुल पाहायला मिळत आहे.
पायात ऑफ व्हाइट रंगाच्या सँन्डल, कानात मोत्याचे कानातले, मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे. मिनिमल मेकअपमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
माधुरीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि कातिल अदा पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली आहे. तिचे चेहऱ्यावरचे तेज तरुणाईला देखील लाजवेल.
माधुरी दीक्षितच्या क्युट फोटोंवर "बार्बी गर्ल", "मेरी जान", "राजकुमारी", "ड्रीम गर्ल", "सुंदरी" अशा कमेंट्स येत आहेत.
माधुरी दीक्षित लवकरच 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. यात अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.
'मिसेस देशपांडे' वेब सीरिजचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर आहे. ही सीरिज 19 डिसेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे