Uddhav Thackeray gearing up for a major show of strength during the senior Shiv Sainik gathering at Shivaji Mandir, Dadar. Saam Tv
Video

आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सज्ज; मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार, दादरमधील मेळाव्यात काय बोलणार?

Uddhav Thackeray Gears Up For Elections: दादरमध्ये होणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा शिवसेना (UBT) साठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Omkar Sonawane

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २० नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून, यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, ठाकरे आपल्या भाषणातून कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच मंगळवारी झालेल्या शिंदे आणि भाजपमधील वादावर उद्धव ठाकरे काय टोलेबाजी करता हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी बहिष्कार, आता CM च्या कार्यक्रमाला दांडी,फडणवीसांचा दम, तरीही शिंदेसेनेत नाराजी कायम

Maharashtra Live News Update: मुंबईत बॅनर कारवाईवरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्याच्या राजकारणात नवी युती होणार?ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार?

खूशखबर! म्हाडाकडून लवकरच भाडेतत्त्वावरील घरे मिळणार, प्रशासनाने उचललं महत्वाचं पाऊल

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

SCROLL FOR NEXT