Ambadas Danve with Manoj Jarange Patil at Azad Maidan, facilitating Uddhav Thackeray’s phone call during Maratha reservation protest Saam Tv
Video

उद्धव ठाकरेंचा जरांगे पाटलांना फोन; अंबादास दानवे भेटीसाठी आंदोलनस्थळी|VIDEO

Uddhav Thackeray Phone Call With Manoj Jarange: मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला महाविकास आघाडीचा पाठिंबा दिला असून अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद घडवून आणला.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला आज महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मनोज जरांगे यांचा फोनवरून संवाद घडवून आणला.

दानवे म्हणाले, मी जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलो होतो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचा फोन आला. त्यावेळी मी विचारलं की, आपण जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहात का? तेव्हा त्यांनी लगेच फोनवर संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, आम्ही उद्धव साहेबांचे प्रतिनिधी आहोत. आमच्यासोबत संजय जाधव, ओमराजे निंबाळकर हे देखील उद्धव ठाकरे यांच्या प्रतिनिधी म्हणून येथे उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली होती. शिंदे समितीकडे कोणतेही अधिकार नाहीत. खरे अधिकार सरकारकडे आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे.

आंदोलनाबाबत मुंबईकरांनी नाराजी न दाखवता सहकार्य करावे, असे आवाहन दानवे यांनी केले. मुंबईकरांचे हाल सुरू आहेत म्हणून मराठ्यांनी येथे आंदोलनाला येऊ नये का? दोन-तीन महिन्यांपूर्वी आंदोलनाची घोषणा झाली होती. आलेल्या मराठी माणसाला मुंबईतील नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Shahapur : ८० लाखाचा बारदान घोटाळा; दोषी मोकाट असल्याचा आरोप, लेखापालांच्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह

GST: गुड न्यूज! जीएसटीमध्ये आणखी कपात होणार, पीएम मोदींनी दिले संकेत

A.R. Rahman: ए.आर. रहमान यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; चोरीचा आरोप फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Prajakta Mali: अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी

SCROLL FOR NEXT