uddhav thackeray Saam TV Marathi
Video

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

शिवसेना नेते कृपाल तुमाने यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार-नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. संजय राऊतांवरील नाराजीमुळे पुन्हा फुट पडण्याची चिन्हे.

Namdeo Kumbhar

uddhav thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याच्या चर्चेने राज्यात जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नागपूरमधील आमदार कृपाल तुमाने यांनी ठाकरेंचे नेते संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केलाय. साम टीव्हीशी बोलताना तुमने यांनी राज्यात खळबळ उडवणारा दावा केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेना नेते कृपाल तुमाने यांनी केलाय. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राऊतांवर तोफ डागली. ठाकरेंचे सर्व आमदार संजय राऊत यांना कंटाळले आहेत. त्यामुळे 80 टक्के मुंबईतील माजी नगरसेवकही शिंदेंच्या संपर्कात आहेत. दसऱ्या मेळाव्यात निमित्ताने अनेक बाबू समोर येतील असाही दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. तुमने यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात मोठी घडामोड घडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT