Uddhav Thackeray Eknath shinde saam tv
Video

शिंदेंचं ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचं 'सीक्रेट ऑपरेशन'?

Operation Tiger : येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू आहे. ते रोखण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनं (Operation Tiger) महाराष्ट्राचं राजकारण पुरतं ढवळून निघालंय. या ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा झटका उद्धव ठाकरे गटाला बसणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे सात खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. शिंदेंच्या काही नेत्यांनी तसा दावा केला आहे. तर सर्व काही आलबेल आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच, ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीला काही खासदारांनी ऑफलाइन, तर काहींनी ऑनलाइन उपस्थिती लावली. तर, ज्याला जायचं त्यानं खुशाल जावं, असा पवित्रा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतल्याची चर्चा होती.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरमुळं उद्धव ठाकरेंच्या गटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. आता शिंदेंचं ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी हे ऑपरेशन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून खासदारांशी संपर्क साधला जात आहे. प्रत्येक खासदारासोबत वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांचं मत ऐकून घेतलं जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संबंधित खासदारांची मते ऐकून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत ती पोहोचवली जाणार असल्याचेही बोलले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उबाठाच्या आमदाराचे नाव

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

SCROLL FOR NEXT