uddhav thackeray health update  AI Image
Video

Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

Uddhav Thackeray Health Update : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांनी चेन्नई दौरा रद्द केला आहे.

Alisha Khedekar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांचा चेन्नई दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. सध्या डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आज चेन्नई आणि मुंबई येथे महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये पुढील राजकीय रणनीती आणि विधेयकाला विरोध करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

चेन्नईमधील बैठक पूर्ण झाल्यानंतर इंडिया आघाडीचे नेते मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी चेन्नई दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मुंबईतील बैठकीलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Queen Necklace : समुद्रकिनाऱ्यावरील दिव्यांची जादू! 'क्वीन नेकलेस' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' सुंदर ठिकाण

Loksabha: डिलिमिटेशनंतर लोकसभेत ८१६ खासदार? केंद्रीय मंत्र्याने शेअर केला भारताचा नवीन राजकीय नकाशा

Maharashtra News Live Update: शहाद्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; १२ वर्षीय बालकावर हल्ला

Bank Holiday December : डिसेंबरच्या पहिल्याच दिवसी बँका असतील बंद; RBI नं का जाहीर केली सुट्टी, जाणून घ्या तुमच्या शहरातील स्थिती

December Travel: डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? देशातील हे ७ खास फेस्टिव्हल्स बनवतील ट्रिप अविस्मरणीय!

SCROLL FOR NEXT