MNS news  saam tv
Video

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल; उद्धव ठाकरेंकडून मनसेला ग्रीन सिग्नल|VIDEO

Uddhav Thackeray Statement On MNS Alliance : मनसे आणि शिवसेना युतीचा चर्चा सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक मोठे विधान केले आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना आता उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला एकत्र येण्याला काही अडचण नाही. आमच्यातले वाद हे क्षूल्लक आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंच्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांकडून दोन्ही ठाकरे बंधूचे बॅनर हे एकत्रित लावण्यात आले.

काल देखील नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. अशातच आज उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं मोठं विधान करून एकप्रकारे मनसे-ठाकरेगट एकत्र येण्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल दिला. आता येणाऱ्या काळात राज्यात काय राजकीय उलथापालथ होतात हे बघण औत्सूक्याचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

Shravan 2025: श्रावणात दाढी का करू नये? कारणे आणि धार्मिक परंपरा

SCROLL FOR NEXT