Uddhav Thackeray to visit Raj Thackeray’s residence with family for Ganpati darshan, sparking political buzz in Maharashtra. Saam Tv
Video

Uddhav And Raj Thackeray: उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणार; ठाकरे बंधूंची तिसऱ्यांदा भेट | VIDEO

Historic Thackeray Brothers Reunion: उद्धव ठाकरे उद्या सहपरिवारासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. ठाकरे बंधूंची ही तिसरी ऐतिहासिक भेट असून महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणार

ठाकरे बंधूंची तिसरी भेट असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राज ठाकरे यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना खास आमंत्रण दिले

शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये या भेटीमुळे नवचैतन्याचे वातावरण

ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून घरच्या गणपतीच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून ते दर्शनासाठी पहिल्याच दिवशी सहकुटुंब शिवतीर्थावर जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे परिवार भेटणार असल्याने मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि हे 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते. हा क्षण अवघ्या महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक होता. यानंतर 27 जुलैला राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेछा दिल्या होत्या. आणि उद्या त्यानंतर तिसऱ्यांदा ही भेट होणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

Maharashtra Elections Result Live Update: रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा पराभव

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT