uddhav thackeray  Saam tv
Video

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; ३ खासदार दिल्लीत, २ नॉट रिचेबल, उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटणार?

Uddhav thackeray group Politics : उद्धव ठाकरेंचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. ठाकरेंचे ३ खासदार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत. तर २ नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड हाती आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटातील बंडखोर खासदार संसदेत वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. ठाकरेंचे तीन खासदार आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दोन खासदार नॉट रिचेबल आहेत. ठाकरेंचे ५ खासदार फुटणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंचे खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटणार का, हे पाहावे लागेल. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यास उद्ध ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पोहोचलेले खासदार

भाऊसाहेब वाकचौरे

संजय जाधव

संजय देशमुख

नॉट रिचेबल खासदार

नागेश पाटील आष्टीकर

ओमराजे निंबाळकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT