Uddhav Thackeray Defends Kunal Kamra Saam Tv
Video

Uddhav Thackeray: कुणाल कामरानं काही अयोग्य केलं नाही; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामाराने केलेल्या विडंबनात्मक टीकेवर उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधला.

Omkar Sonawane

स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे. कुणालने आपल्या शोमध्ये हिंदी गाण्याच्या रिमिक्स वरून एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे बनवले आणि त्या गाण्यांमध्ये शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले. शिवसैनिकांनी त्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. कॉमेडियन कुणाल कामाराने सत्य असलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहे, त्यांनी गद्दारी केली आहे. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कुणाल कामराने काहीही चुकीचे म्हटले असे मला वाटत नाही. कुणाल कामराने सत्य असलेल्या जनभावना मांडल्या आहेत. जे चोरी करत आहेत त्यांनी गद्दारी केली आहे. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे. सुपारी सुपारी काय बोलतात, नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाच्या कबरीची सुपारी कोणी दिली होती?

राज्य आणि देश तुमच्या हातात आहे तरी दंगल कशी होती असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच काल जी तोडफोड केली आहे ती गद्दार सैनिकांनी केली आहे. शिवसेनेने केली नाही या गद्दारांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही. मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना समान पाहिजे त्या स्टुडिओला तोडफोडीची भरपाई दिली पाहिजे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Chandrashekhar Bawankule: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Pooja Sawant Lovestory: आईच्या मैत्रिणीमुळे झाली ओळख, कशी आहे? पूजा सावंतची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update : सोलापुरात धावत्या कारला अचानक भीषण आग

SCROLL FOR NEXT