Minister Uday Samant addressing media in Pune after attacking Uddhav Thackeray over BJP criticism. Saam Tv
Video

Maharashtra Politics: ...तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये, शिंदेंच्या मंत्र्यांनी तोफ डागली|VIDEO

Uday Samant criticises Uddhav Thackeray: शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. भाजप वाईट असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटू नका, अन्यथा दुट्टपी भूमिका दिसते, असे वक्तव्य त्यांनी पुण्यात केले.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे यांनी भाजप औकातीत राहावे असा इशारा दिला.

यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला.

सामंत म्हणाले, भाजप वाईट असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटू नये.

उद्धव ठाकरेंवर दुट्टपी भूमिकेचा आरोप सामंतांनी केला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत औकातीत राहावे असा इशारा दिला होता. यावरच आज मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर भाजप वाईट असेल तर मुख्यमंत्र्यांना का भेटता? भेटून अर्धा अर्धा तास चर्चा का करता? असा सवाल सामंत यांनी केला. ते पुणे येथे एका कार्यक्रमात आले होते त्यानंतर त्यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. भाजप हा पक्ष वाईट असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्याना भेटू नये अशा आमच्या सूचना आहे. भेटायचे अर्धा अर्धा तास गप्पा मारायच्या मग पुढे काहीतरी निर्माण झाले आहे असे दाखवायचे. ही दुट्टपी भूमिका आहे. असा पलटवार उदय सामंत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात, कांदिवली-बोरिवीलीदरम्यान घडली घटना

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Talasari Tourism: मुंबईच्या गोंगाटातून फक्त २ तासांत पोहोचा थेट निसर्गाच्या मिठीत; स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

Crime : घराची मालकीण मुलीला चहा देऊन बेशुद्ध करायची, तिचा मुलगा मित्रांसह अत्याचार करायचा; ७ महिन्यांनंतर...

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

SCROLL FOR NEXT