TWO WOMEN KILLED, SEVERAL INJURED IN PICKUP-RICKSHAW COLLISION ON AMALNER-CHOPDA ROAD saam tv
Video

मजूर महिलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, दोघींचा जागीच मृत्यू, ५-६ गंभीर | VIDEO

Amalner chopda Accident : अमळनेर - चोपडा रस्त्यावर भीषण अपघात झाला. पिकअप वाहनानं रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Nandkumar Joshi

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-चोपडा मार्गावर भीषण अपघात झाला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अमळनेर-चोपडा मार्गावरील अमळगाव येथे हा अपघात घडला. रिक्षा आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. समोरासमोर धडक झाल्यानं रिक्षाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला. मजूर महिला अमळगावकडे रिक्षातून जात होत्या. त्याचवेळी गावाजवळच पिकअप वाहनानं समोरून धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. रिक्षातील दोन मजूर महिलांचा मृत्यू झाला. तर इतर पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अमळनेर आणि धुळे येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT